Thursday, February 2, 2012

प्रश्नमंजुषा -195

---------------------------------------------------------------------------
येत्या शुक्रवारपासून इंटरनेट चे आयपी अड्रेस (IP Address) पूर्णपणे बदलतील. आजतागायत सुरु असलेली IP V4 (आय पी व्हर्जन 4) ची जागा आता IP V6 ( इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6) घेईल. 1980 च्या दशकात सुरु झालेली आय पी व्हर्जन 4 ही सुमारे 4.1 अब्ज आय.पी. देण्यासाठी सक्षम होती. कधीकाळी गगनासारखा भासणारा हा क्रमांक , परंतु बदलत्या काळात त्याहून जास्त आय.पी. असतील हे स्पष्ट झाल्यानंतर नवीन आवृत्ती (व्हर्जन) आता कार्यान्वित होत आहे.
---------------------------------------------------------------------------
1. नेटवर्कमध्ये जोडलेला संगणक खालीलपैकी कशामुळे शोधता येईल ?

A. आय. पी. अड्रेस
B. सब नेट मास्क
C. स्वीच
D. मोडेम

Click for answer 
A. आय. पी. अड्रेस

2.माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या प्रयोजनार्थ " माहिती" मध्ये काय येत नाही ?

A. साउंड
B. कोड
C. मायक्रो फिल्म
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer 
D. वरीलपैकी कोणतेही नाही

3. यु. आर. एल.(URL) या शब्दाची फोड खालील प्रमाणे आहे ?

A. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर
B. युनिवर्स रिसोर्स लोकेटर
C. युनायटेड रिसोर्स लोकेटर
D. युनिअन रिसोर्स लोकेटर

Click for answer 
A. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर

4. वेब पेजेस साठवण्यास व त्यांना ‍‌दृ‍‌‍‍‌श्यरुपात आणण्यास कोणता सर्व्हर उपयोगी येतो ?

A. वेब सर्व्हर
B. मेल सर्व्हर
C. प्रिंट सर्व्हर
D. वरीलपैकी नाही

Click for answer 
A. वेब सर्व्हर

5. एखादी व्यक्ती भू- तलावर कुठे आहे हे शोधण्यासाठी ______________ या नवीन टेक्नोलॉजीचा वापर होतो .

A. जी.पी.एस.सिस्टम
B. रडार सिस्टम
C. रेडीओ व्हेव सिस्टम
D. रेडीओ फ्रिक्वेंसी सिस्टम

Click for answer 
A. जी.पी.एस.सिस्टम

6. मिडिया लॅब एशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झीक्युटीव्ह ऑफीसर श्री ________________ आहेत .


A. सी.व्ही.रामाराजू
B. जी.व्ही.रामाराजू
C. एस.व्ही.रामाराजू
D. यापैकी नाही

Click for answer 
B. जी.व्ही.रामाराजू

7. ___________________ ही संस्था " कंट्रोलर ऑफ सर्टिफाइंग अथोरीटी " (CCA) म्हणून काम पहाते .

A. एन.आय.सी.
B. डि.आय.सी.
C. एल.आय.सी.
D. आय.आर.बी.

Click for answer 
A. एन.आय.सी.

8. मिडीया लॅब एशियाने टेलीमेडीसिन क्षेत्रात टाकलेले पाऊल _____________ या नावाने ओळखले जाते .

A. इ-मेडीसिन
B. इ-धन्वंतरी
C. इ-डॉक्टर
D. इ-मेडहेल्प

Click for answer 
B. इ-धन्वंतरी

9. ज्या लोकांना सर्वसाधारण पुस्तके व वाचनीय साहित्य वाचता येत नाही (अंध व्यक्ती) अशा लोकांना त्यांच्या वाचनाच्या माध्यमात पुस्तके व साहित्य उपलब्ध करून देणारी ___________ ही संस्था आहे .

A. डी.एफ.आय.
B. सि.एफ.आय.
C. एन.ए.बी.एल.
D. एम.एफ.आय.

Click for answer 
C. एन.ए.बी.एल.

10. डी.आय.टी. या शासनाच्या संस्थेने 60,000 देशातील शाळांना संगणक सुविधा, परिपूर्ण लॅब , वेब प्रसारण आणि इ - लर्निंग ह्या सुविधा 3 वर्षात देणारा ___________________ हा उपक्रम सुरु केला

A. "विद्या वाहिनी"
B. "ज्ञान गंगा"
C. "सरस्वती वाहिनी"
D. "ज्ञानकेंद्र"

Click for answer 
A. "विद्या वाहिनी"