Thursday, December 22, 2011

प्रश्नमंजुषा -150


1. इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतात कोणत्या वर्षी झाली ?

A. 1818
B. 1835
C. 1905
D. 1935

Click for answer 
B. 1835

2. __________ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होय.

A. केसरी
B. काळ
C. दर्पण
D. दिग्दर्शन

Click for answer 
C. दर्पण

3. महाराष्ट्रात __________ ह्या जिल्ह्यात तुलनेने अधिक पाऊस पडतो.

A. सातारा
B. रायगड
C. सिंधुदुर्ग
D. गडचिरोली

Click for answer 
C. सिंधुदुर्ग


4. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा गुजरात राज्याला लागून आहेत.

I. नंदुरबार
II. धुळे
III. ठाणे
IV. नाशिक
V. मुंबई उपनगर
VI. मुंबई शहर

A. I,II,III,IV
B. I,II,IV
C. I,II,III
D. वरील सर्व

Click for answer 
A. I,II,III,IV

5. 'विकिपीडिया' ह्या ऑनलाईन नफ्यासाठी काम न करता सामुहिक सहकार्याने तयार झालेल्या जगातील सर्वात मोठ्या मोफत विश्वकोशाचा निर्माता कोण ?

A. मार्क झुकरबर्ग
B. बिल गेट्स
C. जिमी वेल्स
D. ज्युलीयन असांजे

Click for answer 
C. जिमी वेल्स

6. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

A. मुंबई
B. दिल्ली
C. कोलकाता
D. आग्रा

Click for answer 
B. दिल्ली

7. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कायद्यासमोर समानता बहाल करण्यात आली आहे ?

A. कलम 14
B. कलम 15
C. कलम 16
D. कलम 17

Click for answer 
A. कलम 14

8. टाटा सामाजिक विज्ञान संस्था ( Tata Institute of Social Sciences)कोठे आहे?

A. नागपूर
B. औरंगाबाद
C. पुणे
D. मुंबई

Click for answer 
D. मुंबई

9. लोकमान्य टिळकांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ?

A. एक
B. दोन
C. तीन
D. एकदाही नाही.

Click for answer 
D. एकदाही नाही.

10. कॉंग्रेस सर्वसमावेशक नाही ह्या कारणासाठी कोणत्या महान समाजसुधारकाने कॉंग्रेसला विरोध केला आणि तिने तळागाळातील लोकांना, शेतकरी वर्गाला समाविष्ट करावे असे आवाहन केले ?

A. महात्मा फुले
B. गोपाळ गणेश आगरकर
C. महर्षी कर्वे
D. न्यायमूर्ती रानडे

Click for answer 
A. महात्मा फुले

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत