Monday, September 1, 2014

MPSC online test 1


 मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-550
1. आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी नेमण्यात आलेल्या कोणाच्या अध्यक्षतेखालील समितीने बंद पाकिटात आपला अहवाल सुप्रीम कोर्टापुढे नुकताच सादर केला आहे ?

A. न्यायाधीश वर्मा
B. न्यायाधीश मुदगल
C. सुनील गावसकर
D. रवी शास्त्री


Click for answer

B. न्यायाधीश मुदगल
2. कोणत्या महनीय नेत्याचे जीवन पडद्यावर आणण्यासाठी तब्बल 20 वर्षे परिश्रम घेणारे ऑस्कर विजेते ब्रिटिश चित्रपट निर्माते रिचर्ड अ‍ॅटनबरो (90) यांचे अलीकडेच निधन झाले ?

A. सरदार पटेल
B. महात्मा गांधी
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. सर सी.व्ही.रामन


Click for answer

B. महात्मा गांधी
3. बिपन चंद्र यांचे ऑगस्ट 2014 मध्ये निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत ?

A. ख्यातनाम इतिहासकार, स्वातंत्र्य चळवळीचे गाढे अभ्यासक
B. स्वातंत्र्यसेनानी आणि माजी राज्यपाल
C. ज्येष्ठ वैज्ञानिक
D. लोककला अभ्यासक


Click for answer

A. ख्यातनाम इतिहासकार, स्वातंत्र्य चळवळीचे गाढे अभ्यासक
4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच दिवसांच्या जपान दौऱ्यात भारतातील कोणत्या प्राचीन शहराचा जपानमधील क्योटो शहराच्या धर्तीवर विकास करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या ?

A. अहमदाबाद
B. जुनी दिल्ली
C. मथुरा
D. वाराणसी


Click for answer

D. वाराणसी
5. टोनी अ‍ॅबॉट पुढील आठवडय़ात प्रथमच भारत दौऱ्यावर येत आहेत. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत ?

A. ब्रिटन
B. जर्मनी
C. ऑस्ट्रेलिया
D. सिंगापूर


Click for answer

C. ऑस्ट्रेलिया
6. सलग दुसऱ्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्याचा विक्रम नावावर करणारी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू कोण ?

A. पी.व्ही. सिंधू
B. सानिया मिर्झा
C. साईना नेहवाल
D. ज्वाला गुट्टा


Click for answer

A. पी.व्ही. सिंधू
7. पश्चिम घाटाच्या संवर्धनाबाबत __________यांच्या समितीने दिलेला अहवाल अखेर सरकारने गुंडाळला असून त्याऐवजी ____________ समितीचा अहवाल मान्य केला आहे.

A. कस्तुरीरंगन, डॉ.माधव गाडगीळ
B. डॉ.माधव गाडगीळ , कस्तुरीरंगन
C. डॉ.माधव गाडगीळ, नारायण राणे
D. कस्तुरीरंगन, तेंडुलकर


Click for answer

B. डॉ.माधव गाडगीळ , कस्तुरीरंगन
8. 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थे'च्या (ईपीएफओ) वतीने राबविण्यात येणाऱ्या किमान मासिक निवृत्तिवेतनाची मर्यादा वाढवून ___________ करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा योजनांसाठी दरमहा किमान मर्यादा ________ करण्यात आली आहे.

A. पाचशे रुपये, 10 हजार रुपये
B. एक हजार रुपये, 10 हजार रुपये
C. दोन हजार रुपये, 50 हजार रुपये
D. एक हजार रुपये, 15 हजार रुपये


Click for answer

D. एक हजार रुपये, 15 हजार रुपये

या निर्णयाची अंमलबजावणी एक सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
9. सुप्रसिद्ध इंग्लिश लेखक, पत्रकार आणि समीक्षक जॉर्ज ऑर्वेल यांचे जन्मठिकाण आणि त्यांच्या जुन्या घराचे नूतनीकरण करून तिथे जॉर्ज ऑर्वेल यांचे म्युझियम उभारण्याबरोबरच अनेक सोयीसुविधा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नूतनीकरण प्रक्रियेची पायाभरणी नुकतीच करण्यात आली. हे जन्मठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

A. उत्तरप्रदेश
B. बिहार
C. मध्यप्रदेश
D. केरळ


Click for answer

B. बिहार

'अ‍ॅनिमल फार्म', 'नाइन्टीन एटी फोर' यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक म्हणून जॉर्ज ऑर्वेल प्रसिद्ध आहेत. २५ जून १९०३ रोजी मोतिहारी येथे जॉर्ज ऑर्वेल यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव इरिक ऑर्थर ब्लेअर असे आहे. ऑर्वेल यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील आर. डब्ल्यू. ब्लेअर तत्कालीन ब्रिटिश राजवटीतील इंडियन सिव्हिल सव्‍‌र्हिसमध्ये नोकरी करीत होते. ऑर्वेल केवळ एक वर्षांचे असतानाच त्यांचे कुटुंबीय इंग्लंडला परत गेले. ऑर्वेल यांच्या जन्मठिकाणाचे जतन व संवर्धन करून त्या ठिकाणी रोषणाई करण्याबरोबरच ऑर्वेल यांच्यावरील वस्तुसंग्रहालयही बनविण्यात येणार आहे.
10. आगामी शैक्षणिक वर्षांपासून देशात पाच नव्या 'भारतीय तंत्रज्ञान संस्था' (आयआयटी) सुरू करण्यात येणार आहेत. ह्या आयआयटी कोणत्या राज्यात सुरु केल्या जाणार आहेत ?

A. जम्मू-काश्मीर, छत्तीसगढ, गोवा, आंध्र प्रदेश आणि केरळ
B. मणिपूर, झारखंड, छत्तीसगढ, गोवा आणि आंध्र प्रदेश
C. त्रिपुरा, झारखंड, छत्तीसगढ, गोवा आणि जम्मू-काश्मीर
D. राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेश


Click for answer

A. जम्मू-काश्मीर, छत्तीसगढ, गोवा, आंध्र प्रदेश आणि केरळ